सरकार तुमची जमीन कधी ताब्यात घेऊ शकते? जाणून घ्या कायदे आणि प्रक्रिया

एखाद्या खाजगी व्यक्तीच्या जमिनीवर सरकारने ताबा घेतल्याची बातमी आपण नेहमीच ऐकतो. पण अनेकांना या मागचं कायद्याचं स्वरूप, नियम आणि अधिकार याची नीट माहिती नसते. सरकार आपल्या मालकीची जमीन कोणत्या कारणासाठी आणि कशा प्रकारे ताब्यात घेऊ शकतं, याविषयी जाणून घेणं गरजेचं आहे — कारण ही प्रक्रिया एकाच कायद्याच्या अंतर्गत केली जाते, आणि तो कायदा म्हणजे भूसंपादन कायदा 2013.

भूसंपादन कायदा म्हणजे नेमकं काय?

सरकार सार्वजनिक हिताच्या नावाखाली खासगी जमिनीचा ताबा घेत असते, पण त्यासाठी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया असते. “भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा 2013” हेच त्या प्रक्रियेचं मूळ आहे. या कायद्यांतर्गत सरकार विविध विकासकामांसाठी — जसं की रस्ते, धरणं, रेल्वे मार्ग, औद्योगिक प्रकल्प, सेझ (SEZ), ग्रीन एनर्जी हब्स — अशा कामांसाठी खासगी जमीन संपादित करू शकतं.

तसंच सार्वजनिक उपयोगासाठी जसं की शाळा, रुग्णालयं, जलप्रकल्प, संरक्षण क्षेत्रासाठी लष्कर किंवा हवाई दलासाठी लागणारी जागा, किंवा पुनर्वसन प्रकल्पांसाठी देखील जमीन घेता येते.

जमिनीचा ताबा घेण्याची संपूर्ण प्रक्रिया काय असते?

  1. पूर्वसूचना:
    सर्वप्रथम सरकार त्या जमिनीच्या अधिग्रहणाबाबत जाहीर सूचना देते आणि त्यामागचं कारण स्पष्ट करतं.
  2. जमीनधारकांचा प्रतिसाद:
    संबंधित जमीनधारकांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यांच्या हरकती विचारात घेतल्या जातात.
  3. सर्वेक्षण आणि मूल्यांकन:
    जमीन कुठे आहे, किती आहे, आणि तिचं बाजारमूल्य किती आहे, यासाठी अधिकृत अधिकारी सर्वेक्षण करतात.
  4. न्याय्य मोबदला:
    मोबदला ग्रामीण भागात बाजारभावाच्या दुप्पट आणि शहरी भागात १.२५ पट इतका असतो.
  5. पुनर्वसन व पुनर्स्थापन:
    ज्या कुटुंबांना जमिनीतून स्थलांतर करावं लागतं, त्यांना पर्यायी जागा, रोख रक्कम किंवा घर देण्याची तरतूद असते.
  6. ताबा हस्तांतरण:
    ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शासन अधिकृतपणे जमीन ताब्यात घेतं.

जर जमीनधारकाने नकार दिला तर?

अर्थातच, काही वेळा जमिनीचा मालक मोबदला घेण्यास नकार देतो किंवा जमिन देण्याचा विरोध करतो. अशा वेळी कलम 24 अंतर्गत शासन न्यायालयीन परवानगी घेऊन जबरदस्तीने ताबा घेऊ शकतं. मात्र ही प्रक्रिया शेवटचा उपाय म्हणूनच वापरली जाते आणि ती केवळ विशिष्ट आणि अपरिहार्य प्रसंगीच राबवली जाते.

शासनाची प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर

जमिनीचा ताबा घेण्यामागे सरकारचा उद्देश सार्वजनिक हित असतो. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाते. नियमांचे पालन, मोबदल्याची गणना, पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी — या सगळ्यांचा समावेश असतो.

महत्त्वाचं:

आपली जमीन सरकार कधी, कशासाठी आणि कशा पद्धतीनं घेऊ शकते, याची माहिती प्रत्येक भूमालकाला असणं अत्यावश्यक आहे. अनावश्यक भीती किंवा गैरसमज टाळण्यासाठी भूसंपादन कायद्याचं नेमकं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे.

Leave a Comment