Cotton spray : पोळ्याच्या अमावस्याला फवारणी का करावी !
व याचा आपल्याला नक्की फायदा काय होणार पहा सविस्तर माहिती.
नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कृषी या संकेतस्थळावर तुमचा हार्दिक असे स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आपण आज बघणार आहोत की पोळ्याच्या अमावस्येला फवारणी का करावी व याचा आपल्याला कसा फायदा होईल व कोणत्या पद्धतीने फायदा होईल याची आज आपण या लेखनाच्या माध्यमातून परिपूर्ण पणे माहिती घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत बघा व व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा कारण इथून पुढे जे काही शेती विषयी नवीन अपडेट असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत व्हाट्सअप ग्रुप द्वारे घेऊन येत आहोत चला तर सुरुवात करूया.
Cotton spray :
पोळ्याच्या अमावस्याला फवारणी का करावी.. ?
बांधवांनो आपण जर बघितलं तर पोळ्याच्या वेळेला सर्व शेतकरी मित्रांची जी कपाशी असते या कपाशीला बोंड आलेली असतात व ती बोंडे जास्त प्रमाणामध्ये आलेली असतात अशा वेळेला बोंड आळी येण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे मित्रांनो आपल्याला पोळ्याच्या अमावस्येला बोंड आळी वर कशा पद्धतीने नियंत्रण होईल या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे व यामध्ये पातेगळही जास्त प्रमाणामध्ये होत असते त्यामुळे पातेगळही होऊ नये म्हणून आपल्याला फवारणी करायची असते आणि खरं जर बघितलं तर आपण अमावस्याला सर्व अळी अंडी देत असतात त्यामुळे यामध्ये आपल्याला अंडीनाशक ही फवारावी लागेल त्यामुळे अमावस्याला फवारणी करावी कारण त्या औषधाचा प्रभाव डायरेक्ट पूर्ण अळी व त्या अंडी वर होऊन सर्व रोगाचा नाश व्हावा त्यामुळे आपण अमावस्याला फवारणी करावी.