ऑगस्ट महिन्यात कोणती फुले लावाल? बागेच्या सौंदर्यासाठी खास टिप्स

घराच्या गच्चीत किंवा बाल्कनीत छोटीशी बाग तयार करण्याची इच्छा आजकाल अनेकांना असते. सकाळी उठल्यावर हिरवाईसोबत रंगीबेरंगी फुले दिसली, तर दिवस अधिक आनंदी होतो. त्यामुळेच फुलांची लागवड हा अनेकांचा छंद आहे. मात्र, नेमक्या कोणत्या महिन्यात कोणती फुले लावावी, हा प्रश्न अनेकांना पडतो.

ऑगस्ट महिना पावसाळ्याचा असून हवामान दमट असते. या काळात काही फुलझाडांची लागवड केली, तर ती झपाट्याने वाढतात आणि सुंदर बहरतात. चला तर पाहूया, ऑगस्ट महिन्यात कोणती फुले लावावी आणि त्यांची काळजी कशी घ्यावी.

जास्वंद

जास्वंद हे घराघरात आढळणारे आणि पूजेत उपयोगी पडणारे फूल आहे. ऑगस्ट हा महिना या रोपासाठी योग्य मानला जातो.

  • लागवडीसाठी १२-१४ इंचाची कुंडी वापरा.
  • चांगली माती भरून रोप लावा आणि पाणी द्या.
  • या झाडाला दररोज ५-६ तास थेट सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे.
  • उन्हाळ्यात रोज पाणी द्यावे, तर हिवाळ्यात आठवड्यातून दोन-तीन वेळा पुरेसे असते.
    जास्वंदाचे झाड वातावरण शुद्ध करण्यास मदत करते.

झेंडू

झेंडू हा सण-उत्सवात नेहमी लागणारा लोकप्रिय फुलझाड आहे.

  • झेंडूची लागवड बियाणे किंवा कलमांपासून करता येते.
  • लागवडीसाठी माती, कोकोपीट आणि सेंद्रिय खत यांचे मिश्रण वापरा.
  • ४-६ इंचाचे कटिंग घेऊन ते लावले तरी झाड चांगले उगवते.
  • ६०-७० दिवसांत झेंडूचे झाड तयार होते आणि सुमारे ९० दिवसांनी फुलायला लागते.

सूर्यफूल

सूर्यफुलामुळे बागेला वेगळेच सौंदर्य प्राप्त होते.

  • ऑगस्टमध्ये कुंडीत थेट बियाणे पेरा.
  • कुंडी अशी असावी की पाणी साचणार नाही.
  • नियमित पाणी द्यावे आणि मंद सूर्यप्रकाशात झाड ठेवा.
  • साधारणतः ८०-१०० दिवसांत हे फूल बहरते.

डहेलिया (डेलिया)

सूर्यफुलाच्या कुळातील हे झाड रंगीबेरंगी फुलांमुळे आकर्षक दिसते.

  • डहेलियाची लागवडही ऑगस्ट महिन्यात करता येते.
  • या झाडाला चांगला सूर्यप्रकाश (६-८ तास) आवश्यक असतो.
  • सुपीक व निचऱ्याची व्यवस्था असलेली मोकळी माती वापरा.
  • नियमित खत घातल्यास झाडाला उत्तम बहर येतो.

शेवटची टिप

ऑगस्ट महिन्यात जास्वंद, झेंडू, सूर्यफूल आणि डहेलिया या फुलांची लागवड केल्यास काही महिन्यांतच बाग रंगीबेरंगी आणि आकर्षक दिसेल. योग्य पाणी, खत आणि सूर्यप्रकाश दिल्यास ही फुले दीर्घकाळ टिकतात आणि घराचे वातावरण अधिक प्रसन्न करतात.

Leave a Comment