PM Kisan 20th Installment Update:
ज्या शेतकऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने स्पष्टपणे जाहीर केले आहे की २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रु. 2000 ची मदत थेट जमा होणार आहे.
५ महिन्यांनंतर येणारा हप्ता, वाढलेली अपेक्षा
फेब्रुवारी २०२५ मध्ये १९ वा हप्ता वितरित झाल्यानंतर जवळपास ५ महिने शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली. या काळात अनेक अफवा आणि चर्चांना ऊत आला होता – कुठे संभाव्य तारखा सांगितल्या जात होत्या, तर कुठे चुका नोंदवल्या जात होत्या. पण अखेर सरकारने अधिकृत घोषणा करून शेतकऱ्यांना निश्चित माहिती दिली आहे.
तुमचं नाव यादीत आहे का? तात्काळ अशी तपासा
पात्रतेची खात्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात:
- PM Kisan अधिकृत वेबसाइट वर जा.
- होमपेजवर ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
- आपला आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
- ‘Get Data’ वर क्लिक करा.
जर तुमचं नाव यादीत असेल, तर तुम्ही हप्ता मिळवण्यासाठी पात्र आहात. नाव दिसत नसल्यास, त्वरित स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.
हप्ता न मिळाल्यास काय कराल? अशी नोंदवा तक्रार
जर मागील १९ वा किंवा येणारा २० वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला नसेल, तर खालील मार्गांनी तक्रार दाखल करू शकता:
- PM Kisan पोर्टल वर जा.
- ‘किसान कॉर्नर’ विभागात ‘Register Grievance’ वर क्लिक करा.
- तुमचे तपशील भरून तक्रार सबमिट करा.
- तक्रारीची स्थिती ‘Complaint Status’ वरून तपासता येते.
याशिवाय, खालील टोल-फ्री क्रमांकावर फोन करूनही तक्रार करता येते:
- 155261
- 1800-115-526
तसेच, जवळच्या CSC केंद्रातून किंवा कृषी अधिकाऱ्यांच्या सहाय्याने देखील तक्रार नोंदवता येते.
हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण आहेत का?
तुमच्या खात्यावर हप्ता जमा व्हावा यासाठी काही आवश्यक गोष्टी तपासून घ्या:
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का?
- मोबाईल नंबर अपडेट आहे का?
- e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे का?
या सर्व अटी पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यात हप्ता जमा केला जाणार आहे.
