शेतजमिनीची मर्यादा तपासायची असो, नवीन रस्ता आखायचा असो, किंवा जमीन विक्री-विकत घेण्यापूर्वी तपशील जाणून घ्यायचा असो – या सगळ्या गोष्टींसाठी जमिनीचा अधिकृत नकाशा असणे अत्यावश्यक असते. पूर्वी ही माहिती मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयांचे फेरे मारावे लागायचे, पण आता ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने ‘महाभूनकाशा’ (Mahabhunakasha) या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अधिकृत जमिनीचे नकाशे इंटरनेटवर उपलब्ध करून दिले आहेत.
ऑनलाईन नकाशा पाहण्यासाठी काय करावे?
- महाभूनकाशा पोर्टलवर भेट द्या:
mahabhunakasha.mahabhumi.gov.in - स्थानिक तपशील निवडा:
- राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
- ‘Rural’ (ग्रामीण) किंवा ‘Urban’ (शहरी) विभाग निवडा
- गावाचा नकाशा पाहण्यासाठी:
- ‘Village Map’ वर क्लिक करा
- नकाशा स्क्रीनवर दिसेल, झूम इन/आऊट करून तपशील पाहू शकता
- फुल स्क्रीन मोडदेखील उपलब्ध आहे
प्लॉट किंवा गट नकाशा कसा शोधायचा?
- ‘Search by Plot Number’ हा पर्याय निवडून, सातबाऱ्यावर असलेला गट क्रमांक टाका
- त्या गटाचा नकाशा तात्काळ स्क्रीनवर दिसतो
- डावीकडील ‘Plot Info’ विभागात:
- संबंधित शेतकऱ्यांची नावे
- क्षेत्रफळ
- शेजारील गट क्रमांक इत्यादी माहिती सहज मिळते
नकाशा डाऊनलोड कसा करावा?
- नकाशा दिसल्यावर ‘Map Report’ वर क्लिक करा
- उजव्या कोपऱ्यातील डाउनलोड चिन्हावर (↓) क्लिक करून PDF स्वरूपात सहज डाऊनलोड करता येतो
ई-नकाशा प्रकल्प म्हणजे नेमकं काय?
भूमि अभिलेख विभागाने सुरू केलेला ‘ई-नकाशा’ (e-Map) हा उपक्रम म्हणजे जुने, नाजूक नकाशे डिजिटल स्वरूपात आणण्याचा प्रकल्प आहे. याअंतर्गत:
- फाळणी नकाशे
- भूसंपादन व बिनशेती नकाशे
- तालुका स्तरावरील विविध जमिनीचे आराखडे
सर्व काही डिजिटल होत आहेत. त्यामुळे आता जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी कोणतेही कागदपत्र किंवा कार्यालयात धावपळ करण्याची गरज उरलेली नाही.
नवीन पिढीच्या डिजिटल शेतकऱ्यांसाठी वरदान
ई-नकाशा प्रणालीमुळे:
- जमीन व्यवहार अधिक पारदर्शक होणार
- कर्जप्रक्रिया सुलभ होणार
- फेंसिंग व मालकी सिद्ध करणे सोपे होणार
नवीन पिढीतील शेतकऱ्यांसाठी ही सुविधा म्हणजे एक डिजिटल क्रांती आहे. मोबाईलवर काही क्लिकमध्ये जमिनीचा नकाशा पाहणे आणि डाऊनलोड करणे ही आता शक्य झालेली गोष्ट आहे.
